Posts

Showing posts from October, 2015

ओझं नसलेलं नाव..

चल आज विषय निघालाच तर नंबर डीलिट करण्याचे कारण सांगून टाकते. एक तर मला माणसांची जाम सवय होऊन जाते. गप्पा मारणे, फाल्तू जोक, मस्त शेअरिंग, कविता मेसेज करून वाचायला भाग पाडणे वगैरे वगैरे.. त्यात झालं एकदा आपलं भांडण. जामच वाईट रे. मग ठरवलं तुझ्याशी बोलायचं नाही. ज्या माणसासाठी आपण त्याच्या चौथ्या किंवा पाचव्या सर्कलमध्ये येतो त्या माणसाशी का इतकं सगळं बोला.. नाही बोलायचं मला..म्हणून नंबर डीलिट केला. स्वतःची सवय मोडण्यासाठी. नंबर दिसत राहिला असता तर डायल करण्याचा मोह होतो म्हणून. आणि मला नंबर  लक्षात राहणं कठीण. त्यामुळे तो कधी डायरेक्ट डायल केला गेला नसता. त्यामुळे माझ्यापुरता माझा उपाय. तुला काहीच न सांगण्याचा. कित्ती काय काय नावांनी तुझं नाव सेव्ह केलं होतं. दर वेळी काही तरी नवीन नाव. बडी, बेस्टेस्ट पर्सन, भांडकुदळ... आणि एक दिवस ते सारं डीलिट.. मग पुन्हा नंबर सेव्ह केला तेव्हा तुझ्या नावाने केला. आता नव्हते असं काही नाव ठेवणार. पुसलं ते पुसून गेलं. पुन्हा बोलायला लागलो. पूर्वीइतकेच. पूर्वीपेक्षाही जास्त. पण ती मजा होती बडी म्हणून नाव सेव्ह करण्यातली ती हरवली कुठेतरी. मैत्रीतले ...