मोठं होणं...
तु्झ्या माझ्या गप्पांमधला चंद्र तेवढा उरलाय सोबत. तू न हरवूनही हरवलेला वाटतोस. हे सांगायचंय, ते सांगायचंय इथपासून प्रवास करत सांगायला काय नेमकं उरलंय असा प्रश्न पडतो. सभोवतालचं जग बदललंय, मी बदलले की तू बदललास.. ना. धों. महानोरांच्या कविता वाचत होते परवा-परवाच. मग वाटलं नदीकाठच्या तुझ्या आवडत्या ठिकाणी बसून त्या दोघांनी वाचायला हव्या होत्या. असं वाटतंय तोच राहू दे, एकट्यानेच वाचूया असं वाटलं. हातात तो क्षण येता येता निसटून गेला. मोठे झालो रे आपण. असं किती काळ मोठं होत राहायचंय. कविता वाचताना ती जगता न येऊन तसंच जगत राहायचंय. मन डोक्यात असतं की हृदयात. जरासं काढून पाहू का बाहेर? नेमकं काय झालंय त्याला. दहा वर्षं झाली की मैत्री तुटत नाही ना. तशी तुटणार नाहीच पण निसटलीय बहुधा ती हातातून. कुठल्या तरी दूरच्या किनाऱ्यावर दिसतोस पण तिथवर प्रवास करावासाच वाटत नाही. नदीच्या प्रवाहात वाहतोय तसे वाहत जाऊया असं वाटतं. कदाचित तुलाही तसंच वाटत असेल. आपण नेमकं काय करतोय- पैसे कमावतोय म्हणून कविता, गाणी, गप्पा असं सगळं विसरलोय का. मोठं तर तेव्हाही होतच होतो की. पण त्या मोठं होण्यात हो...