वेध
हायवे मूव्ही पाहिला तेव्हा पंजाब, हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर, लडाख असा वेगवेगळ्या प्रांतातून प्रवास करायला जाम टेम्प्ट झालं होतं. हायवेमधलं प्रत्येक गाणं पाहते तेव्हा अजूनही हेच वाटतं. मनमुराद प्रवासाकडे मन ओढलं जातं. पण गाडीतून नाही. ट्रकमधूनच. बसच्या टपावरून. मग विचार करत बसले होते. मी ट्रक ड्रायव्हर असते तर. एवढा प्रवास नीट केला असता का. रस्ते प्रवासाचा त्रास बिस होतो. गाडी बिडी लागते. ट्रक ड्रायव्हर असते आणि गाडी चालवताना असा त्रास झाला असता तर... हाच प्रश्न मला एसटी, बस ड्रायव्हच्या बाबतीत पण पडतो. एसटीची ड्रायव्हर असते तर काय केलंं असतं.. एवढ्या लोकांना सांभाळणं तर दूरच स्वतःला सांभाळू शकले असते का.. किती पेशन्स ठेवून एसटी चालवत असतील हे एसटीचालक. म्हणजे जिथे आपण टिकू शकत नाही हे माहीत असतं तिथे टिकेन का असं इमॅजिन करून पाहायचं. उगाचच. म्हणजे कदाचित त्यांचे कष्ट लक्षात येतात. किंवा ते किती कठीण असतं हे कळतं. काल ससून डॉकला गेले होते. ससूनला एक प्रदर्शन सुरू होतंय. ससून जाता-येता पाहिलं होतं पण आत कधीच गेले नव्हते. माशांच्या वासापासून तसा लहानपणापासूनच पळ काढलाय. काल ...