शोध
-किती ढ असावं माणसानं -मेजरिंग कप नाही मोजायला ढपणा. तू मोज -माझी पोरं मोठी झाली प्रॅक्टिकल का असावं ते समजावं म्हणून तुझ्याकडे पाठवणार आहे मी -पाठव. मी पण चार धडे देईन मी शिकलेले. प्रॅक्टिकलपणाचे. तसा ढपणाचा मेजरिंग कप मिळाला ना की आपण तो वितळवूया. त्याला वेगळा छानसा आकार देऊया. ढवाल्या कपाचा आकार अगदीच बद्द असेल ना. पण कदाचित तो कप मिळणं सोपं जाईल. मग तो घेऊ. नि त्याचा आकार बदलून टाकू. नि मग त्यात मैत्री मोजता येते का शोधूया. कळेल मग कदाचित एवढीच मैत्री करायची तर परफेक्ट ठरेल. ७०च मिलीलीटर. किंवा ९० च मिलीलीटर. नाही तर तापली तर भांड्यातून उतू जाईल. ती मैत्री भांड्यातून उतू जायच्या आधी कळायला हवं. ग्रे शेड्स असतातच आयुष्यात. पण किती असतात ते कोणत्या चष्म्याने शोधायचं. -तुझ्या आजूबाजूला माणसं नव्हतीच का कधी अशी. होती की. मी पाहिलंय. की तू दुर्लक्ष केलंस त्यांच्याकडे. -नाही. ती तशी आहेत का हे शोधायची मला गरज भासली नाही. तेवढ्यापुरतीच होती ती. त्यामुळे ती कशीही असली तरी तुझ्या मेजरिंग कपाने मोजलेली मैत्री होती ती. त्यामुळे अशी तशी कशीही असली तरी फरक पडला नाही....