Posts

Showing posts from February, 2013

रंगीबेरंगी दिवसांच्या छटा...

रंगीबेरंगी दिवसांच्या छटा... आज अभिज्ञचा अॅन्युअल डे इव्हेण्ट होता. त्याचा परफॉर्मन्स पाहताना स्वतःच्या वार्षिकोत्सवाची आठवण नसती झाली तरच नवल होतं. मन पार माझ्या ज्युनिअर केजी , सिनिअर केजीमध्ये पोहोचलं. त्याचा परफॉर्मन्स आज लाइव्ह यु-ट्युबवर दिसत होता. त्याच्या आईने , आजीने दोघींनी लाइव्ह नेटवर पाहिला. ही छोटी-छोटी पिलं एवढी गोड-गोड दिसत होती. त्यांना शामक दावर डान्सिंग स्कूलच्या मदतीने ट्रेन करण्यात आल्याचं सांगण्यात येत होतं. प्रत्येक क्लासमधल्या प्रत्येकाला स्टेजवर यायची संधी देण्यात आली होती. ग्रुप डान्समध्ये कोण स्वतःचं किती स्किल्स दाखवतंय याचा विचार करण्यात आला नव्हता. कोण टिचरचं पेट आहे , कोण नाही याने काही फरक पडत नव्हता. टिचरला कोण जास्त टॅलेन्टेड वाटतंय आणि कोण नाही याने फरक पडला नव्हता. सगळे सारखे. अगदी एक सारखे. पण माझ्या शाळेत, माझ्या लहानपणी खरंच असं नव्हतं. का नव्हतं मला माहीत नाही. नर्सरी, ज्युनिअर केजीचा वार्षिकोत्सव खरंच आठवत नाही पण सिनिअर केजीचा आठवतोय. आमच्या शाळेच्या गच्चीवर झाला होता. शाळेच्या गच्चीवर जायचं हा सगळ्यात मोठा आनंद होता. एक नाटक होतं ...

Loksatta- balranga katha- after many many yers

बंटीची फ्लॅट भजी    अनुजा चवाथे , रविवार ९ ऑक्टोबर २०११ भजी खायला तुम्हाला आवडते? येस्स. मला पण आवडते. बंटीलापण आवडते. आता हा बंटी कोण, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. बंटी म्हणजे माझा सगळ्यात लहान मित्र. बंटी शाळेतून घरी आला आणि त्याला दुधासोबत खायला काय हवं, असं विचारलं की त्याचं पहिलं उत्तर असतं भजी. रोजचा एकच प्रश्न आणि रोजचं एकच उत्तर. सध्या तो भज्यांचा सॉल्लिडच फॅन झालाय. अर्थात त्याची आई त्याला रोज-रोज भजी खायला देत नाही, हे वेगळं. त्याच्या आईने, आजीने, ताईने त्याला खूप समजावून सांगितलंय की रोज असं भजी खाणं चांगलं नाही, पण त्याचा हट्ट काही केल्या संपत नाही. म्हणून मग त्याची आईही त्याच्या हट्टाकडे फारसं लक्ष देत नाही. तो मागतो भजी आणि त्याच्या समोर येतो उपमा, पोहे, कॉर्नफ्लेक्स, राजगिऱ्याचा लाडू वगैरे वगैरे. त्यातलं चोच मारल्यासारखं तो खातो आणि बाकी त्या प्लेटमध्ये तसंच पडून राहतं. कधी कधी त्याला भजी खूपच हवीशी असते. कुरकुरीत भजी, तोंडाला पाणी सुटणारी भजी.. पण आईने त्याकड...

Loksatta- Balranga

सांग ना गं आई? अनुजा चवाथे - रविवार, २६ जून २०११ सांग मला, त्या चंद्रावरती डाग कसा गं आई रोज रोज घासूनपुसून तो आंघोळ का करत नाही.. सांग मला त्या बेडकाचा घसा बसला का आई गरम गरम पाण्याने तो गुळण्या का करत नाही.. जंगलामधल्या वाघाला कोणी गं मारलं आई अंगावरती त्याच्या सगळ्या किती वळ उमटले बाई.. एकाही प्रश्नाचं तुजजवळ उत्तर कसं गं नाही, एवढी मोठ्ठी झालीस तरी तुला काहीच माहीत नाही.. एवढा मोठ्ठा पगार तुला कसा देतात आई यापेक्षाही सोपे प्रश्न तुला विचारतात का काही.. त्या प्रश्नांची उत्तरं, ती तरी देतेस का आई नाही आलं उत्तर तर काय करतात तुझ्या बाई..

loksatta- mazi pahili published balkavita तू घरी येणार यंदा...

तू घरी येणार यंदा...      अनुजा चवाथे , रविवार , २८ ऑगस्ट २०११ बाप्पा, तू घरी येणार यंदा तेव्हा माझ्या आवडीचा नैवेद्य चालेल ना रे तुला? पिझ्झा, बर्गर, आईस्क्रिम खाताना माझ्याइतक्याच मिटक्या मारता येतील ना रे तुला? बाप्पा, तू घरी येणार यंदा तेव्हा माझ्यासोबत सायकलवरून येशील का माझ्या फ्रेंडस्च्या घरी सगळेच बिझी असल्याने दे त्यांना दर्शन, जाऊन त्यांच्याच दारी बाप्पा, विसर्जनाच्या दिवशी बसू आपण दोघेच कुठेतरी लपून म्हणजे मोठी माणसं तुला एकटय़ाला देणार नाही समुद्रात सोडून

Lokprabha clm- spandan 1

Image
  ६ ऑगस्ट २०१० स्पंदन मृण्मयी तुझं असं काही विचित्र रूप दिसलं त्या फ्रेंडशिप डेला ज्याबद्दल कधी स्वप्नातही विचार केला नव्हता मी आणि मग माझा हात आपसूकच उठला तुझ्या थोबाडीत द्यायला. त्यानंतर पुन्हा कधी तुझा चेहराही आयुष्यात आठवणार नाही असं ठरवलं. त्या चार वर्षांमध्ये खूप छान मित्र बनलेलो आपण, पण तुझं असं विकृत रूप कधी दिसलं नव्हतं. ‘नाही आठवणार म्हटलं की, जरा जास्तच आठवतं जुनं-पानं सारं डोळ्यांसमोर नाचतं..’ कुठच्या तरी चिटोऱ्यावरच्या तुझ्या या काही ओळी. धड चारोळी नाही, धड हायकू नाही. तू मला ऐकवलेलं तुझं पहिलं एक्स्प्रेशन. आज अचानक नीट आठवलं. काही दिवसांपूर्वी आठवायचा प्रयत्न केला होता पण पूर्ण नव्हतं आठ...

Lokprabha- another cover story i liked - Firuni navi janmen mi

Image
२७ मे २०११ कव्हर स्टोरी अनुजा चवाथे स्त्री-पुरुष समानतेबद्दल कितीही घसाफोड करून सांगितलं तरी झपाटय़ाने घटलेलं मुलींचं प्रमाण या समानतेचा दावा हाणून पाडतं. मुलगाच हवा हा हट्ट काय सांगतो? मुली गायब होतात तरी कशा? आज, केवळ मुली वाचवा म्हणून चालणार नाही. गर्भलिंग निदान व निवडीच्या बाबतीतला कायदा अधिक सक्षमपणे राबवला जाण्याची गरज आहे. केवळ शपथा घेऊन ही परिस्थिती बदलणार नाही. त्यासाठी मानसिकता बदलायला हवी. ही मानसिकता अनेक शतकांची आहे. त्यामुळे या मानसिकतेविरोधात सुरू झालेला संघर्ष उद्याच्या उद्या यशस्वी होईल अशी कोणतीच खात्री देता येत नाही. पण तरीही पुरुषप्रधान संस्कृतीचं हे बधिरत्व गळून पडेल आणि ही परिस्थिती बदलेल ही आशा आहे. तिने घर समर्थपणे सांभाळलंय होतंच पण तिचा...

lokprabha- kurtadu sahyadriche kade- d realization

Image
२१ मे २०१० कव्हरस्टोरी अनुजा चवाथे सह्याद्री उजाड करणाऱ्या खाणींची पाहणी करण्यासाठी पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते, खाणींच्या परिसरातले शेतकरी, आणि पत्रकारांचा अभ्यासदौरा दक्षिण गोव्यातून आखला गेला. १८ एप्रिल या ‘वर्ल्ड हेरिटेज डे’चं निमित्त साधून गोव्यातल्या पश्चिम घाटातल्या काही विशेष हेरिटेज साइट्सला भेटी देण्यासाठी हा दौरा होता. केपेपासून बिचोलीपर्यंतचा खाणीमुळे उद््ध्वस्त झालेला आणि होत असलेला गोवा पाहणे हा उद्देश होता. या दौऱ्यामध्ये पर्यावरणवादी, सामाजिक कार्यकर्ते, खाणींच्या परिसरात राहणारे शेतकरी, या खाणींच्या प्रश्नाशी थेट संबंध नसलेले गोव्यातले काही नागरिक आणि पत्रकार सहभागी झाले होते. पूर्व गोव्यातल्या शंभरेक किलोमीटर परिसरातल्या अनियंत्रित खाणकामामुळे उजाड झालेली जंगलं, तीन अभयारण्यं, गोव्याला पाणी पुरविणाऱ्या धरणांपासून, समुद्रपातळीच्याही खाली ३७ मीटर खोल गेलेल्या शिरगावच्या खाण...