Posts

Showing posts from February, 2017

तू की मी...

तू हरवलायस किंवा मी हरवलेय. किंवा हे खरं नाहीय. तुझ्याशी गप्पा मारायचे तेव्हा कागद संपायचे पण विचार नाहीत. काही ना काही सुचत राहायचं. कुठे नातं उलगडायचं तर कुठे भावना. काहीच नाही मिळाले तर चार शब्द तरी फुटायचे. आता उगाच वाटतंय अशाच गप्पा मारतेय, तरी सुचत मात्र काहीच नाहीय. वाटतं उलगडतंय पण ते तिथेच गुंतून पडून राहतं. अर्घवट. मग यातून नेमकं काय निसटलंय. तू की मी... चार वेळा काहीतरी लिहायचा प्रयत्न केलाय आणि अर्घवट सोडून दिलंय. पुढचं काहीच सुचलं नाही म्हणून. माझ्या लिहिण्याचा पालक होतास का तू.. त्याचं पालकत्व मीसुद्धा कधी स्वीकारलं नाही. की त्याचं पालकत्व तुझ्याकडे होतं म्हणून मी त्याला स्वीकारलं नाही कधी. तुला माहितीये, चंद्र येतो निघून जातो. ट्रेनमधून जाताना त्याच्याकडे पाहायलाही विसरतेय. तो पण शोधत असेल का रे मला जशी मी आत्ता त्याला शोधतेय. पण हे या क्षणाचं बरं. तो दिसत असतो तेव्हा त्याच्याशी गप्पा मारायला विसरतेय. पूर्वी ट्रेनच्या दारात उभं राहून कित्ती काय काय सांगायचे. कुठे गेलंय ते सगळं. खिडकीच्या काचेला डोकं टेकून गाणी ऐकायचे. मग ती गाणी तुला सांगायचे. मग त्यात तू स्...