Posts

Showing posts from October, 2022

प्रवास शिकवतो...

  ग्रामीण भागातील समस्या जाणून घ्यायच्या तर काहीसा प्रत्यक्ष अनुभव घ्यावाच लागतो.  सकाळी काही बातम्या फाइल करून संध्याकाळच्या बसने मध्य प्रदेशात जायला निघाले. मला बसचा प्रवास आवडत नाही. अजिबातच. पण पर्याय नव्हता. इंदूरवरून बडवानीला जायचं तर चार तासांचा प्रवास होता उलटा. त्यापेक्षा बडवानीजवळ उतरून मग पुढचा प्रवास करणं सोपं होतं.  त्या आठवड्यात भरपूर पाऊस होता. माझ्या पिक अप पॉइंटपर्यंत पोहोचेपर्यंत मुसळधार पाऊस सुरू झाला. नशिबाने पिक अप पॉइंट हा बरं हॉटेल होतं. त्यामुळे किमान सुरक्षित उभं राहणं शक्य होतं. १५-२० मिनिटं पावसात काढल्यानंतर एकदाची बस आली. बसमध्ये बसून मग चिमुकली बातमी फाइल केली. त्यात मला मिळालेली जागा ही चाकावरची होती त्यामुळे दणादण उडत होती बस. म्हटलं सगळं अनुभवलं पाहिजे. सारं कसं सोपं नि आपल्याला सोईस्कर मिळावं...  बसमध्ये चढताना लॅपटॉपची बॅग, कपड्यांची लहान बॅग आणि पर्स सांभाळताना पर्सचा गळ्यात स्लिंगप्रमाणे अडकवण्याचा पट्टा कशात तरी अडकून तुटला. माझी ही पर्स एका खांद्यावरही घेण्याच्या लायकीची होती त्यामुळे पुढचे मध्य प्रदेशातील दिवस निभावले. बाहेरच्य...

माणसं

 माझे काही मित्रमैत्रिणी माणूस म्हणून अगदी हलकेच माणूसपण अधोरेखित करतात. राजकीय मतभेद असले तरी माणूसपण जपतात. नि ते खूप छान वाटतं. ते जगाच्या पाठीवर कुठेतरी असतात, मी काही कधी लिहित असते ते वाचतात. बातम्याही कधी कधी वाचतात. नि मदतीसाठी पुढेही येतात हे छान वाटतं. दोन वर्षांपूर्वी करोनाच्या काळात बडोद्याहून महाराष्ट्रात चालत येणाऱ्या मुलांची बातमी केली.  नंदुरबारहून योगिनी आणि लतिकाने पुढाकार घेत या मुलांना त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित कसं पोहोचवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न केले. तेव्हा या दोघींची ओळख फेसबुकपुरतीच होती.  योगिनीने लोकांना अपील केलं मदतीचं. आम्ही सरकारी पातळीवरही बोललो. फार कारभार हालताना दिसेना मग फेसबुकवरूनच अपील केलं. माझे मित्र-मैत्रिणी उभे राहिले. या मुलांच्या प्रवासासाठी सुमारे एक लाखांचा निधी पार्ले टिळकच्या मित्रमैत्रिणींच्या माध्यमातून उभा राहिला.  अभिमान वाटावा अशी बाब होती. एकरकमी ५० हजारांची मदत एका शाळेतल्याच मित्राने केली. पण त्याने नाव जाहीर करायचं नाही अशी स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलीये. त्यामुळे ते नाही सांगणार.  आत्ता नवरात्रीच्या का...