Posts

Showing posts from December, 2018

आऊटडेटेड बचपन..

Image
आधीच सांगतेय ही शार्पनर्स माझ्यासाठी नाहीत. मी फक्त प्रयत्न करत होते जरासा आनंद शोधण्याचा. काही दिवसांपूर्वी मी म्हटलंच होतं की माझ्या लहानपणी मला वेगवेगळ्या आकाराच्या शार्पनर्सनी खेळायला आवडायचं. बोरिवलीत मला तशी शार्पनर कुठेच मिळाली नव्हती. म्हणून म्हटलं आज दुसऱ्या ठिकाणी शोधूया. एके ठिकाणी जायचं होतं. त्या आधी हातात थोडा वेळ होता. पार्ल्यात होते. या पार्ल्यात माझं बालपण हुंदडलंय. त्यामुळे बदलाच्या खुणा शोधत शोधत फिरत होते. हनुमान रोडवर मॅक्-डी सुरू झालंय की. बापरे! हे माहीतच नव्हतं. कित्ती काय काय बदलतं नि कित्ती काय काय तेच असतं. याच हनुमान रोडवर एबीसी नावाचं स्टेशनरी शॉप आहे. या एबीसीमधून कित्ती पेनं (मराठीत पेनं च म्हणतात आमच्यात) विकत घेतलीयत. किती पॉइंट फाइव्ह पेन्सिल्स. प्लास्टिकचा राऊंडर.. असं तसं खूप काही.. त्या एबीसीमध्ये गेले. अर्र.. त्या आधी अंधेरीला कमल स्टेशनरी स्टोअर म्हणून आहे. तिथेही गेले होते. अंधेरीला एका डॉक्टरांकडे काम होतं. या अंधेरीत आयुष्याची अडीच वर्षं काढलीयत. तर कमल स्टोअर्समध्ये जाऊन विचारलं वेगवेगळ्या शेप्सची शार्पनर आहेत का.. त्याने बिचाऱ्या...