Posts

Showing posts from July, 2017

आभाळाचा तुकडा

Image

वर्तुळ!

वर्तुळ ! रिया, तुला एक गोष्ट सांगायचीच राहिली. काय रे.. खरं तर लग्न ठरताना हे सांगायला हवं होतं पण राहून गेलं. माझी बहीण प्रेग्नंट आहे.. मग त्यात काय.. छान आहे की बातमी. त्यात लपवण्यासारखं काय होतं आणि आत्ता मुद्दाम का सांगतोयस. म्हणजे संदर्भ नसताना... अगं असं नाही. राहून जात होतं ना. म्हणून.. आज आईने विचारलं की तुला सांगितलं का , तेव्हा मला आठवलं की हे सांगायचं राहून जातंय. अरेंज्ड मॅरेज आहे ना आपलं.. मग.. त्याने काही फरक पडतो का ? मला कळत नाही अरेंज्ड मॅरेजचे रुल्स. नाही गं ! फरक पडत नाही. पण सांगितलं नाही असं व्हायला नको ना. तू घरी येशील लग्न करून तेव्हा सुरुची बच्चूसकट घरी असेल. ती घरी जाईपर्यंत गडबड असेल घरात. निवांत गप्पासुद्धा मारायला मिळणार नाहीत आपल्याला ती असताना. ठीक आहे की, मी तिच्याशी गप्पा मारेन. तसंही तू मेसेंजरवर चिकटलेला असतोस. दोघं सोबत असतो तेव्हाही. रिया यार... असं नाही. पण सवय झालीय आता. सुटेल हळुहळू... सुरुचीचा चौथा महिना सुरू झाला तेव्हा रियाला अखेर शुभंकरने सांगितलं. अरेंज्ड मॅरेजमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्याने होकार नकार बदलतो असं त...