Posts

Showing posts from September, 2020

चल उडून जाऊ

  नितळ नदी पाहायला जाऊया... चल. हात पकडून उडून जाऊ. नदीमध्ये पाय नाही बुडवायचे. तिच्यामध्ये फक्त डोकावून पाहायचं. पायांना खरं तर खूप मोह होईल त्यात बुडायचा. पण त्यांना घट्ट बांधून टाकायचं जमिनीशी. पाण्याला नासवायचं नाही. त्याला बिघडवायचं नाही. फक्त नदीच्या आरपार दिसणारे दगड-गोटे पाहायचे. त्यांना म्हणायचं किती लकी आहात तुम्ही. नदीच्या कुशीत पहुडायला मिळतं. तेवढ्यात नदीचं गाणं ऐकू येईल. ते ऐकायचं. किनाऱ्यावर त्या गाण्यावर नाचता आलं तर नाचायचंही. मंद-मंद. स्वतःत रमून जात. गाण्याचे शब्द नाही कळले तरी चालतील. काहीच फरक पडत नाही. गाणं एकदा भिनलं ना आपल्यात की शब्द मग वेगळे उरत नाहीत. ते त्यांचा अर्थ घेऊन प्रवाही होऊन जातात. परवा मणिपुरी नृत्य पाहत होते. एक शब्दही कळला नाही. पण नाचावसं मात्र वाटलं. असं खूप खूप स्वतःत रमायचं असेल तेव्हा असं शांत शांत करणारं काही पाहायचं, काही करायचं. नदी पण तशीच नाचते. हळुवार हातवारे करत. स्वतःभोवती गिरक्या घेत. हळुवार डुलत. ताल धरत. चल, पटकन् मेघांच्या घरात जाऊन येऊ. मेघआंचं आलय. पक्ष्यांशी मैत्री होते का तिथे जाऊन पाहू. आपल्याही ओंजळीत इवलं पाखरू येऊन वि...