क्रीमचं बिस्किट
आज ऑफिसमधून निघाले तेव्हा जाम भूक लागली होती. खूप उशीर झाला होता. मध्ये थांबून खायला घेणं इम्पॉसिबल होतं. प्लॅटफॉर्मवर बर्बन (उच्चार ज्याला जसा वाटेल तसा करावा.. ) बिस्किट्स घेतली. तीन बिस्किट्स खाल्ल्यावर थोडी भूक तर भागली. मग जीभ मात्र म्हणाली थोडा और.. पण बिस्किट खायचा मूड नव्हता.. ऑब्वियसली मग बिस्किट ओपन करून फक्त क्रीम खाल्लं. फारच कमी क्रीम होतं. लहानपणी एका बिस्किटच्या क्रीमचा मस्त चिमुकला चेंडू व्हायचा. पण हे क्रीम फारच कमी होतं. बरं एक बिस्किट ओपन करून क्रीम चट्टाम ट्टा केल्यावर दुसरं बिस्किट पण म्हणालं काइंडली रिपीट द सेम प्रोसेस.. ;p मी लग्गेच तसं केलं.. शेवटचं बिस्किट पण तेच म्हणणार होतं. तेवढ्यात समोरच्या सीटवर एक चिमणी बसली होती. ती तिच्यासोबतच्या आजींना म्हणाली.. देखो वो मेरे जैसे खाती है.. ऊप्स... आजूबाजूला कोणी असतं याचं भान का बरं बाळगावं लागतं.. मी तिच्याकडे पाहिलं, ती हसली.. वो इनोसंट स्माइल.. हाय मेरा तिसरा क्रीम का बिस्किट जानेवाला है.. तिसरं बिस्किट काढलं.. त्याचं क्रीम वेगळं केलं.. तिच्यासमोर धरलं.. म्हटलं.. खाओगी..? मेरे जैसा? ती नको म्हणाली....