Posts

Showing posts from March, 2017

नाही मन निर्मळ...

तुझ्या गंगेच्या किनारी बसून शोधत होते गंगेचं पवित्रपण. तुला दिसलेलं. अर्धा तास पण नव्हते तिथे. पण त्या वेळात मला शोध घ्यायचा होता. तुला मिळणाऱ्या शांतीचा. तुला दिसणाऱ्या तिच्या पावित्र्याचा.  तुला कुठून दिसते तुझी गंगा निर्मळ... मला नाही दिसलं तसं काही. दृष्टीदोष असेल. सगळीच तर घाण केलीय तिला. तिच्याकडे टक लावून बघत होते. गढुळलेलं पाणी दिसलं. गढुळलेलं की बाटलेलं. काळसर होतं ते. तुला दिसायचा ना त्या पात्राचा तळ. पात्राच्या जवळ गेले ते शोधायला. पण नाही दिसला . कुठे चुकून मासे दिसत होते, म्हणून पटली ओळख तिच्या अजून जिवंत असण्याची. मला आठवत राहिलं तिचं या पावसाळ्यातलं रुद्र रूप. लाल पाणी. जीवघेणं. प्रचंड भडकल्यावर फेकाफेक करत स्वतःच्या शांत होण्याची वाट पाहणारं. इथे पावसात किती पाणी असतं... स्वाभाविक प्रश्न होता तो. हे सगळं पात्र भरलेल असतं. एवढ्या आत तर येऊच शकणार नाही कोणी, मला मिळालेलं उत्तर. पावसाळ्यात येऊन पाहायला हवं, तिचा आवाज ऐकत एखाद्या जवळपासच्या दगडावर कान लावून झोपायला हवं. कदाचित तुला उमगलेलं तिचं नदीपण मलाही उमगेल. जेव्हा एकटेपण पिऊन टाकायचं असतं तेव्हा मी गंगेच्या किनार...

काचा बिचा

काचा बिचा वाटेवर कुठे सांडल्या, पडल्या काचा बिचा वाटेवर उन्हात माखल्या काचा बिचा वाटेवर मातीत रुतल्या चमकल्या किरणांनी डोळा चटकन दिसल्या काचा बिचा वाटेवर पायात जायच्या काचा बिचा वाटेवर रक्तअस्तित्व जपायच्या.. उन्हाने केली ही कमाल डोळ्यात झोंबती किरणे काचाबिचा चुकवून वाट पुढची शोधणे...