Posts

Showing posts from March, 2018

भिंती

याला हेच नाव का.. असंच. उलगडेल ते. पहिल्याच वाक्यात सगळं कसं सांगायचं. लिहायचं की नाही असं सतत विचार करत होते. काय लिहायचं, कसं लिहायचं.. पण लिहितेय. अर्थात यालाही विरोध होईल. यातले काही विचार पटणार नाहीत. पण बंधन आहे कुठे तसं. मी लिहिलेलं वाचलं म्हणजे ते पटलंच पाहिजे नि तेच विचार बरोबर असं नाहीय. नाही पटलं तर वाचा नि पुढे चालू लागा. पटलं तर काय करायचं तुम्हीच ठरवायचं. मी फक्त लिहिणार. कांदिवलीच्या शाळेतून दुसरीत पार्ले टिळकमध्ये आले. शाळा नकोशी व्हायची मला. सगळे मित्रमैत्रिणी मागे सुटले होते. नव्या शाळेत कोणीच ओळखीचं नव्हतं. अंधेरीच्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दोघी मैत्रिणी वेगळ्या शाळेत. जामच वाईट वाटायचं. पण दुसरीतलं वाईट वाटणं हळूहळू मैत्रिणी मिळाल्या तसं मागे सरलं. तिसरी.. तिसरीत आल्यावरच चार आठमध्ये जायचंय हे ऐकू यायला लागलं. कसं, कुठे आठवत नाही. दि ला स्कॉलरशिप मिळाली होती. त्यामुळे मलाही ती मिळवायचीच होती. म्हणून तिसरीचा अभ्यास. मार्क कसे कमी मिळाले.. मला काय माहीत मार्क कसे कमी मिळाले.. अजूनही नाही माहीत. मला पाठांतर बिठांतर कधीच जमलेलं नाही. मला फक्त लिहायला जमतं. पाठ...

एक स्पेशल चाय

माझा मित्र अलीकडेच मला जेमतेम दहा मिनिटं भेटून गेला. तब्बल वर्षाने भेटलो. दहा मिनिटांमध्ये अधाशासारखं बोलले मी. हे सांगायचंय, ते सांगायचंय. जसं फोनवर बोलतंच नाही. पण तरी खूप सांगायचं होतं नि वेळ कमी होता. मग धड काहीच झालं नाही. फक्त भेटल्याचा आनंद. किंवा पुढच्या वर्षभरासाठीचं गाठोडं. गेल्या महिन्याभराबद्दल त्याला खूप काही सांगायचं होतं. उलथापालथी, मजा असं खूप काही. नि त्यातलं काहीच सांगितलं नाही. उगीच सांगितल्यासारखं केलं. आगापिछा नसताना दोन चार वाक्यं झाली नि दोघंही आपापल्या वाटेने निघून गेलो. वाईट पण वाटून घेता येत नव्हतं कारण समोर काम होतं. त्याला म्हटलं वाईट पण वाटून घ्यायला वेळ नाही. नि त्याचा काहीच रिप्लाय नाही... काल फोन बदलला तेव्हा बरेचसे नंबर गायब झाले. त्याचाही गायब झाला. त्याला म्हटलं सेव्हच करणार नव्हते तुझा नंबर. काहीही सांगत बसते तुला. पण केलाच फायनली सेव्ह नंबर. इमोशनल अप-डाऊन फेस करताना मित्रमैत्रिणी केवळ सोबत असणं खूप महत्त्वाचं असतं. ते किती जवळ आहेत, किती लांब आहेत याने फरक पडू नये. पण ज्यांना असे मित्रमैत्रिणी नसतात त्यांचं काय. म्हणजे नवरा-बायको मित्...