काचा बिचा

काचा बिचा
वाटेवर
कुठे सांडल्या, पडल्या
काचा बिचा
वाटेवर
उन्हात माखल्या
काचा बिचा
वाटेवर
मातीत रुतल्या
चमकल्या किरणांनी
डोळा
चटकन दिसल्या
काचा बिचा
वाटेवर
पायात जायच्या
काचा बिचा वाटेवर
रक्तअस्तित्व
जपायच्या..
उन्हाने केली ही कमाल
डोळ्यात झोंबती किरणे
काचाबिचा चुकवून
वाट पुढची शोधणे... 

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ