डोळ्यातला दुष्काळ
- Get link
- X
- Other Apps
पाण्यासाठी तडफडणाऱ्या तुला.... आणि फक्त तुलाच...
पाणी इतकं तळाला गेलंय
की तळ पाण्यावर तंरगतोय
बाई ग,
शोधतेस तरी कसं पाणी...
गढूळलेलं पाणी हंड्यात भरताना
धीर कुठून गोळा करतेस,
कच्च्याबच्च्यांना तेच पाणी देताना
स्वतःला काय समजावतेस...
ते पाणी स्वच्छ तरी कसं करतेस
लहानपणी ऐकलेलंस ना,
पाणी गाळून, उकळून प्यावं...
विरघळत नाही का तुझ्या मनाच्या आगीत
त्या गढुळल्या पाण्यातले खडे...
तुझ्या डोळ्यातलंच पाणी खरं शुद्ध,
ते बघताना तडफडते मी,
माझ्या डोळ्यातही पाणी येतं
पण त्यात तुझी शुद्धता नाही...
तुला द्यायला माझ्याकडे
शुद्ध पाण्याचा थेंबही नाही...
माझ्या स्वतःच्या डोळ्यातही
स्वार्थी जगण्याची भेसळ आहे....
पाण्यासाठी तडफडणाऱ्या प्रत्येक तुला... फक्त तुलाच
की तळ पाण्यावर तंरगतोय
बाई ग,
शोधतेस तरी कसं पाणी...
गढूळलेलं पाणी हंड्यात भरताना
धीर कुठून गोळा करतेस,
कच्च्याबच्च्यांना तेच पाणी देताना
स्वतःला काय समजावतेस...
ते पाणी स्वच्छ तरी कसं करतेस
लहानपणी ऐकलेलंस ना,
पाणी गाळून, उकळून प्यावं...
विरघळत नाही का तुझ्या मनाच्या आगीत
त्या गढुळल्या पाण्यातले खडे...
तुझ्या डोळ्यातलंच पाणी खरं शुद्ध,
ते बघताना तडफडते मी,
माझ्या डोळ्यातही पाणी येतं
पण त्यात तुझी शुद्धता नाही...
तुला द्यायला माझ्याकडे
शुद्ध पाण्याचा थेंबही नाही...
माझ्या स्वतःच्या डोळ्यातही
स्वार्थी जगण्याची भेसळ आहे....
पाण्यासाठी तडफडणाऱ्या प्रत्येक तुला... फक्त तुलाच
- Get link
- X
- Other Apps
शप्पथ......
ReplyDelete