हँगिग बुफे
गुंडू जेवताना खूपच टंगळमंगळ करायचा. जेवताना ताटावरून उठून त्याची गाडी घरभर फिरून, वेगवेगळी स्टेशन्स घेत थांबायची आणि मग पंख्याखाली जेवण गार होऊन जायचं. मग गुंडूला आजी जबरदस्ती मांडीवर घेऊन भरवायची. तसा शांतपणे जेवावं मग बागडायला जावं हे समजायला गुंडू फार मोठा नाही. अवघ्या पाच वर्षांचा आहे. मात्र त्याने शाळेत असं वागू नये, व्यवस्थित जेवावं म्हणजे अंगाला लागेल असं मानणारी त्याची आजी त्याने एका जागी बसून जेवावं म्हणून खूप प्रयत्न करते. त्यासाठी चांदोबाची गोष्ट सांगते ती गुंडूला. चांदोबासाठी त्याच्या आईने वाढून ठेवलेल्या ताटात होतं मस्त तूप. आणि त्या तुपात माशी पडली म्हणून तो उपाशी राहिला असं ती अनेकदा सांगते. गुंडूला मात्र त्याने काहीही फरक पडत नाही. तो त्याचा मूड असेपर्यंत जेवतो आणि मग त्याची झुकझुकगाडी घरभर फिरते.
तर झालं असं की, गेल्या आठवड्यात त्याच्या मम्माने घरी फालुदा केला होता. फालुदा गुंडूला आवडतो मात्र ही गोष्टसुद्धा तो एका जागेवर बसून खात नाही. थोडासा फालुदा खाऊन झाला आणि नेहमीप्रमाणे त्याला खायचा कंटाळा आला. तो जागेवरून उठून खेळायला गेला. मम्मा, बाबा, आजी, पणजी सगळे फालुद्याचा आस्वाद घेण्यात गुंतले होते. गुंडूच्या ग्लासमध्ये अर्ध्यापेक्षा जास्त फालुदा उरला होता. एवढ्यात एक मोठ्ठी माशी त्याच्या ग्लासभोवती फिरताना गुंडूला दिसली. तो क्षणभर तिथेच थांबला. त्या माशीने त्याच्या फालुद्याच्या ग्लासमध्ये मस्त डाइव्ह मारली आणि हे बघून गुंडूला रडू यायला लागलं. माझा फालुदाSSSSS म्हणत त्याने भोकांड पसरलं. आज्जी चांदोबाच्या माशीने फालुद्यात जंप केलं बघ… आज्जीला कळेना चांदोबाची माशी म्हणजे… मग तिचं लक्ष फालुद्याच्या ग्लासकडे गेलं. ती माशी जेलीमध्ये तडफडत होती. तिने सिंकमध्ये तो ग्लास रिकामा केला. इथे गुंडूचं रडू-रडू सुरूच होतं. मम्मा आणि बाबा दोघेही त्याला ओरडले. तू वेळच्या वेळी नीट खात नाहीस. ताटात अर्धवट अन्न टाकून उठतोस. असे गोड पदार्थ उघड्यावर ठेवल्यावर माश्या येणारच, असं ते त्याला सांगत होते. तू नाही जेवत तर किमान माश्यांना जेवू दे पोटभर…
मम्मा आणि बाबाचं बोलणं ऐकून तर त्याला आणखीनच रडू आलं. मला फालुदा हवाय आत्ताच्या आत्ता म्हणून त्याने अजून जोरात रडायला सुरुवात केली. आजीने त्याला दुसऱ्या ग्लासमध्ये थोडा फालुदा दिला. त्याचं रडू थांबावं म्हणून मग आजीने चांदोबाच्या माशीला पण भूक लागते म्हणून ती असं करते, असं सांगितलं. चांदोबाच्या माशीला पण उडायचं असतं. तिला उडायला ताकद लागते. मग असं उघड्यावर ठेवलेलं अन्न पाहून तिला ते खावंसं वाटतं. त्यात तिची काय चूक… दिलं थोडंसं कधीतरी माशीला तर काय हरकत आहे… गुंडूचं रडणं थांबावं म्हणून आजीने त्याला हे सांगितलं.
दुसऱ्या दिवशी शाळेत गेल्यावर त्याने टिचरला ही चांदोबाच्या माशीची गोष्ट सांगितली. गुंडूने आणि त्याच्या सगळ्या फ्रेंड्सनी मग डब्यातला थोडा खाऊ माशी, मुंगी यांच्यासाठी काढून ठेवला. रिसेस संपताना टिचरने पाहिलं तर चार-पाच डेस्कवर थोडीशी पोळी, भाजी, चीप्स, कुरमुरे असा खाऊ त्यांना दिसला. तेव्हा टिचरने त्यांना विचारलं की हे का काढून ठेवलं. तर या मोहिमेमध्ये पुढाकार घेतलेल्या गुंडून त्यांना सांगितलं की आजी म्हणाली माश्यांना जगायला आपल्यासारखंच जेवावं लागतं त्यामुळे त्यांना अन्न शोधायचा त्रास होऊ नये म्हणून हा खाऊ काढून ठेवलाय.
त्याच्या टिचरना नक्की काय प्रतिक्रिया द्यावी हे कळेना… मग त्यांनी एक कल्पना लढवली. त्या म्हणाल्या, आपण फक्त माश्या, मुंग्या यांच्यासाठी खाऊ काढण्यापेक्षा इतर पक्ष्यांसाठीसुद्धा काढूया. आपण त्यांच्यासाठी रोज दाणा बुफे तयार करू. उद्या वर्गात येताना तुम्ही प्लॅस्टिकच्या जुन्या वापरात नसलेल्या बाटल्या आणा. उद्या आपण त्यांच्यासाठी हँगिग बुफे टेबल तयार करूया. दुसऱ्या दिवशी गुंडू आणि त्याचे मित्र प्लॅस्टिकच्या बाटल्या घेऊन वर्गात पोहोचले. प्रत्येकाने दोन ते तीन बाटल्या आणल्या होत्या. टिचरने शाळेतल्या शिपाईदादांच्या मदतीने या बाटल्या मस्त कापून घेतल्या. त्यांना दोन बाजूंना भोकं पाडण्यात आली. मग साध्या दोरीने या बाटल्या टांगून ठेवण्याची सोय करण्यात आली. टिचरने गुंडूच्या वर्गाच्या बाहेर चार बाटल्या लटकवल्या. या बाटल्यांमध्ये पाणी भरण्यात आलं. उरलेल्या बाटल्या बाकीच्या सीनिअर आणि ज्युनिअर केजीच्या वर्गाबाहेर लटकवण्यात आल्या. गुंडूच्या टिचरने या सगळ्या क्लासमधल्या बच्चे कंपनीला पक्ष्यांसाठी पावसाळा सुरू होईपर्यंत आणि नंतरही या बाटल्यांमध्ये पाणी भरून ठेवायचं, दाणे टाकायचे असं सांगितलं. उन्हाळ्यात पक्ष्यांना पाणी मिळत नाही. आपण त्यांना पाणी दिलं तर ते खूप आनंदी होतील आणि तुमचे मित्र होतील असं त्यांना टिचर म्हणाल्या आहेत. शिपाईदादांनाही या हँगिग बुफेची स्वच्छता करायला सांगण्यात आलंय. हा बुफे तयार केल्यानंतर दोन दिवस त्याकडे कोणीच फिरकलं नाही. मात्र तिसऱ्या दिवशी एक चिमणी आली आणि आता तर रोजच या वर्गाबाहेर रोज सकाळी, दुपारी चिवचिवाट ऐकू येतोय. मध्येच एखादा पोपट, साळुंकीही या हँगिग बुफेचा आस्वाद घेते. वर्गाबाहेरचा हा चिवचिवाट ऐकून गुंडू जाम खूश होतो. त्याने आता घरीही असा हँगिग बुफे करूया असं सांगितलंय. उरलेलं खरकटंही आपण त्या हँगिग बुफेमध्ये ठेवू शकतो असंही त्याने सांगितलंय. त्याची ही भूतदया आयुष्यभर टिकू दे, असं आजी रोज म्हणते. मात्र या भूतदयेमुळे आता जेवता जेवता तो ताटावरून उठला तरी पक्ष्यांना जेवण उरावं म्हणून उठलोय असं तो सांगतो आणि ओरड्यापासून स्वतःला वाचवतो.
-अनुजा चवाथे

Comments
Post a Comment