भूकेची गोष्ट
गेले दोन तीन दिवस लिहायचं ठरवूनही निसटून जात होतं.
गेल्या आठवड्यात दादर स्टेशनवर सेंट्रलचा 6 नंबरच्या प्लॅटफॉर्मवर ट्रेनची वाट बघत थांबले होते.
एक अंध बाबा आणि त्यांची मुलगी भीक मागत येत होते. ब्रिजच्या खाली एक बाई बसल्या होत्या. विटकी साडी. तसाच रंग गेलेला ब्लाऊज. हातात गुंडाळून घेतलेली कापडी पिशवी. जुन्या, वारंवार तुटून परत शिवून घेतलेल्या चपला, गळ्यात मोत्यांची माळ.
त्यांच्या बाजूला एक मुलगा बसला होता. त्याने त्या बाबांच्या हातातल्या वाटीत सुट्या पैशांची नाणी टाकली. त्यानंतर त्या बाईंनी बाबांसोबतच्या मुलीला विचारलं जेवलीस का.. ती नाही म्हणाली. अडीच वाजून गेले होते. त्या बाईंनी पिशवी उघडली. त्यामध्ये एका प्लॅस्टिकच्या पिशवीत पोळ्या होत्या. त्या पोळ्या आणि वर्तमानपत्रात गुंडाळलेली भाजीची प्लॅस्टिकची पिशवी त्यांनी त्या मुलीच्या हातात ठेवली. त्या मुलीला किंबहुना तिच्या बाबांना उद्देशून त्या बाई म्हणाल्या, जेवणाची वेळ टळून गेलीय. हातातल्या वाटीत भाजी घ्या आणि लेकीला जेवायला द्या. तुम्हीही जेवा. पुन्हा जेवल्याशिवाय मागायला जाऊ नका.
त्यांचं म्हणणं ऐकून, मानून ते दोघे जेवायला गेले.
त्या बाई बाजूच्या मुलाला सांगायला लागल्या की एवढीशी पोरगी किती वेळ उपाशी राहील.
ट्रेन येताना दिसली तशा त्या उठल्या. सोबत कोणी एक माणूस हेता. प्लॅस्टिकच्या साध्या स्लीपर्स घातलेला. पाय थोडासा ओढत तो माणूस आणि त्या बाई ज्या डब्यात चढायचं होतं तिथे जाऊन उभ्या राहिल्या.
तू काय खाणार एवढंच वाक्य मी ऐकलं.. उत्तर ऐकायची उत्सुकता होती पण ट्रेन आली नि उत्तर हरवलं..
त्या बाई काय खातील असा प्रश्न नंतर सीएसटी येईपर्यंत डोक्यात फिरत राहिला..
संध्याकाळी डबा खाताना तोच प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला आणि मग जाणवलं की एवढी मनाची श्रीमंती माझ्याकडे नसावी.. माझ्या लक्षातही आलं नाही की डबा तर माझ्याकडेही होता...

Comments
Post a Comment