Loksatta- Balranga
| सांग ना गं आई? |
सांग मला, त्या चंद्रावरती
डाग कसा गं आई
रोज रोज घासूनपुसून
तो आंघोळ का करत नाही..
सांग मला त्या बेडकाचा
घसा बसला का आई
गरम गरम पाण्याने
तो गुळण्या का करत नाही..
जंगलामधल्या वाघाला
कोणी गं मारलं आई
अंगावरती त्याच्या सगळ्या
किती वळ उमटले बाई..
एकाही प्रश्नाचं
तुजजवळ उत्तर कसं गं नाही,
एवढी मोठ्ठी झालीस तरी
तुला काहीच माहीत नाही..
एवढा मोठ्ठा पगार
तुला कसा देतात आई
यापेक्षाही सोपे प्रश्न
तुला विचारतात का काही..
त्या प्रश्नांची उत्तरं,
ती तरी देतेस का आई
नाही आलं उत्तर तर
काय करतात तुझ्या बाई..
Comments
Post a Comment