मै डाँटू और तुम डरना..

#reflections
आज दिवसभर ओ साथी रे हॉण्ट करत होतं. गाणी चिकटून बसतात जिभेला.. मनाला...
या गाण्यात एक ओळ आहे. कभी कभी यूँ करना, मैं डाँटू और तुम डरना...
कसली भारी आहे ही ओळ
ही ओळ ऐकताना त्याचं एक वाक्य आठवलं.
तुला सॉरी ऐकायला आवडतं ना इतरांकडून...
त्याचं झालं असं
आमच्या दहा वर्षांच्या मैत्रीत खूप भांडलोय. कचाकचा भांडलोय. दर वेळी तो चुकला मी बरोबर हे सिद्ध करण्याचा माझा अट्टाहास. त्याची बेदरकार वृत्ती. तू उडत गेलीस नि तू उडत गेलास हा दोघांचाही ठरलेला अॅटिट्यूड. दोघांनीही एकमेकांना खूप हर्ट केलंय. पण परवाच्या बोलण्यात तोच म्हणाला की मी पूर्वी वागलो त्यावेळी फारसा विचार करत नव्हतो. कोणाला दुखवायचा हेतू नसायचा पण दुखावलं जातंय कोणी हा विचार पण यायचा नाही.
मग मी म्हटलं म्हण आता इतक्या वर्षांसाठी सॉरी. नि तो म्हणालाही... पण त्यावर पुष्टीही जोडली.. तुला फक्त लोकांकडून सॉरी म्हणून हवं असतं ना...
म्हटलं हो.
जेव्हा मी बरोबर आहे, हे मला शंभर टक्के माहीत असतं तेव्हा होच... ते सिद्ध करण्यासाठी तर मी प्रयत्न करते. काय सांगायचं असतं मला नेमकं... मी हर्ट झालेय... तू वागलास ते चुकीचं आहे. असं वागू नकोस.. किंवा असंच काही...
अनेकदा ते त्या वेळी सिद्ध होत नाही. कधी नंतर होतं. कधी नाही होत. पण मला मी बरोबर आहे, समोरची व्यक्ती चूक करतेय हे माहीत असतं. म्हणून ते सॉरी हवं असतं. ते सॉरी वागण्याचं रिअलायझेशन असतं म्हणून...
आता तर तो उगाच पण सॉरी म्हणतोय. मला सॉरी हवं असतं असं वाटून.. :D लहान मुलांना येता जाता चॉकलेट दिलं तरी आवडीनं खातात ती तसं काहीसं...
पण तसं नाहीय.
खरं तर त्याच्याकडून सॉरी स्वीकारण्याच्या पलीकडे गेलेय. त्याच्याशी भांडले तरी आम्ही परत बोलणार याची खात्री असते. त्यामुळे कुजकेपणा करूनही आम्ही बोलतोच एकमेकांशी. कुजकेपणा पण कमी झालाय. दहा वर्षांची मॅच्युरिटी.. हं, पण त्याने चूक मान्य केली हे छान वाटणारं होतंच. कभी कभी यूँ करना, मैं डाँटू और तुम डरना... अस्संवालं फीलिंग होतं ते.. उगाचवालं...
त्याच्या सॉरीला फारसा अर्थ उरला नव्हता. कारण ती सगळी भांडणं मिटली होती. फक्त त्याला  मनापासून सॉरी फील झालं याचा आनंद होता. किंवा मी बरोबर होते हे सिद्ध झालं याचा...किंवा... मला काय वाटलं असेल हे त्याच्यापर्यंत पोहोचलं एकदाचं याचाही आनंद असेल तो...
या गाण्याची ही ओळ तुझ्यासाठी. अख्खं गाणं आज माझ्यासाठी होतं. मा्त्र ही ओळ तुला, तुझ्या सॉरीला...
-अनुजा

Comments

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ