माझी सोबत...

कानात साठवून आणलेली
समुद्राची गाज,
डोळ्यांत गोळा केलेला
पाण्याचा रंग,
मुठीत घट्ट पकडून ठेवलेला
उधाणलेला वारा,
की बोटांवर वेचलेले
संध्याकाळचे रंग,
तुझं चित्र पूर्ण करण्यासाठी
नेमकं काय देऊ तुला...
कदाचित आताही तसंच
होतं-नव्हतं दिलं असतं
पण मन निग्रहाने सांगतंय,
पुनःपुन्हा नाही व्हायचं रितं...
यापूर्वी दिलं सारं
तुझी चौकट भरून,
मात्र माझं चित्र हरवलं,
गेलं काळोख्या डोहात बुडून...
केलंय सारं पुन्हा नव्याने जमा
वर्षंवर्षं कणाकणाने वेचून,
आता चित्र रंगवायचंय,
या सगळ्या रंगात रंगून...
पण जुन्या एका वचनासाठी
त्यातलं थोडं देईनही तुझ्यावर उधळून,
त्यानंतर मात्र
तूही अपेक्षा करणं दे सोडून...
यानंतर मला
माझी चौकट सजवायचीए,
हे चित्र संपल्यावर
मग एकेक चांदणी वेचायचीए...
जगण्यासाठी मलाही
पुन्हा एकच संधी हवीए,
खरं सांगू तुला...
आता हसण्यासाठी मला
फक्त माझीच सोबत हवीए 


(January 15, 2013 at 5:35pm)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

क्रीमचं बिस्किट

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ