गुलमोहोराला पाहताना लिहिलेले शब्द एका मस्त मित्रासाठी
Sunday, December 5, 2010 at 12:57am ·
तेवढे शंभर रुपये माझे
तुझ्याजवळ उधार ठेव
एका अलौकिक कलाकृतीची ओळख करून दिल्याचे
लहानसे बक्षीस म्हणून,
मी शेवटचा श्वास घेतल्यावर
चिंब भिजणाऱ्या पावसात घराबाहेर पड
अंगात पाऊस रुजेपर्यंत
पाऊसवाऱ्यासारखा गरगरत राहा
त्या शंभर रुपयांची मग गुलमोहोराची फुले तेवढी आण
माझ्यावर पसरायला
अचेतन शरीरालाही जाणवेल त्या गुलमोहोराची लालसर उब
आयुष्यभर त्या पेटलेल्या रंगाकडे पाहत
आतल्या आत फक्त जळले
म्हणूनच त्या फुलांना नक्की आण
माझ्यासाठी
माझ्या आगीत माझ्यासोबत जळायला…
Comments
Post a Comment