करायला हवंय आता मला माझंही मृत्युपत्र कदाचित जगायला मिळालंय तेवढं पाडून घ्यावं दान ओंजळीत.. काय घडेल, कुठे घडेल नाही समीकरण जुळत जातोय जीव असाच सगळ्यांचाच.. सगळ्यांच्याच नकळत! कोण जाणे कधी संपेल चार श्वासांचं लेणं असेलही उधार कदाचित सध्याचंच जगणं.. कोणतरी खेचतं वरून दोरी नि संपतं जगणं रक्ताच्या चिखलात शेवटचा श्वासही मिळत नाही वेदनेची जाणीव फक्त डोळ्यांत.. असंच झालं तर घ्यायचा कसा निरोप शेवटचा, कृतज्ञतेची जाणीव होती, तेवढाच हळवा कोपरा जरासा.. म्हणूनच करायचंय एक मृत्युपत्र लहानसं, ते वाचताना नक्की स्मरेल माझं जगणं जरासं.. पैसा तर नसेलच खिशात फारसा पण पुस्तकांचा खजिना दे उधळून, दुर्गम खेड्यातल्या मुलांमध्ये वाचनवेडा आनंद जाईल सहज रुजून! कॅमेऱ्यामध्ये टिपेल सहज माझं भाचरू, माझं उरलं गाणं त्याच्या फोटोंत जगून घेईन झाडापावसातलं शिल्लक जगणं.. कवितांची डायरी माझी आहे कपाटाच्या तळाशी तिच सांगेल तुला तिची विल्हेवाट कशी लावायची.. किंवा देऊन टाक डायरी माझ्या पक्क्या दोस्ताला तोच येऊन सांगेल की, आठवायचं गप्पांमधल्या मृण्मयीला.. थोडंसंच पाहून खूपसं सांगतेय.....
Comments
Post a Comment