कुरतड...
प्रवास
नेहमीच काही पाहायला शिकवतो. लोकप्रभापर्यंतच्या प्रवासाने मला खूप काही
दाखवलं. ते अडीच तास सार्थकी लावणं मला कळायला लागलं होतं. माणसं,
त्यांच्या भावभावना, मी त्यांच्यावर थोपलेल्या भावना, माझा
त्यांच्याबद्दलचा दृष्टीकोन... आताही ते थांबलेलं नाही. कधी रस्ता, कधी बस,
कधी रिक्षा... हे सारं बोलत राहातं आतल्या-बाहेरच्या माणसांसकट.
आज एका दहा-अकरा वर्षांच्या मुलाला पाहिलं. केसाचं जंगल वाढलेलं. अंगावर सिमेंट-काँक्रिटची पुटं चढलेली. कपडे उसवलेले, वेगळ्या रंगाच्या धाग्याने शिवलेले. पायात चपला होत्या की नाही ते मात्र दिसलं नाही. त्याच्याकडे लक्ष जाण्यासाठी ही सारी कारणं पुरेशी होती. त्याच्याकडे पाहताना प्रश्न पडला की त्याला या बसचं तिकिट परवडत असेल का... उत्तर मिळालं नाही म्हणून मग फारसं शोधलं नाही. त्या उत्तरापेक्षा आणखीही काही होतं त्या मुलाकडे. त्याचे भिरभिरणारे डोळे. चेहऱ्यावर सगळ्या जगाशी लढू शकेल असा कॉन्फिडन्स पण डोळ्यात मात्र प्रचंड निरागसता. त्याच्याच चेहरा आणि त्याचेच डोळे पण दोन्ही गोष्टी खूप वेगळं काही सांगत होत्या.
बस ड्रायव्हरच्या मागच्या रेलिंगला धरून तो उभा होता. दर दोन-चार मिनिटांनी अख्ख्या बसकडे डावीकडे-उजवीकडे मान वळवून तो पाहात होता. काय शोधत होता... त्यातल्या एका कोणी त्याच्याकडे पाहून स्माइलही दिलं. त्याची रिअॅक्शन कळली नाही. मग वाटलं कदाचित तो असं आश्वासक हसू तर शोधत नसावा... खूप वाटलं त्याच्याशी बोलावंसं. त्याला विचारावंसं की काय हवंय. मग उगाच वाटलं, नसत्या भानगडीत पडलो तर... आणि त्याचा अवतार. अंह... मनाचा बुरसटलेपणा काही संपला नाही. तो उतरेपर्यंत मन अर्धवटच हवेत राहिलं. नेहमीप्रमाणे होतं-नव्हतं, खरं-दांभिक, व्हाइट कॉलर्ड टिपिकॅलिटी-झोकून देण्याची आस या सगळ्यांकडून कुरतडून घेत बसलं. एक कुरतडलेला तुकडा कदाचित त्या मुलासोबत रस्त्यावरही सांडला... त्याला कधी दिसला तर तो...

Comments
Post a Comment