क्रीमचं बिस्किट

आज ऑफिसमधून निघाले तेव्हा जाम भूक लागली होती. खूप उशीर झाला होता. मध्ये थांबून खायला घेणं इम्पॉसिबल होतं. प्लॅटफॉर्मवर बर्बन (उच्चार ज्याला जसा वाटेल तसा करावा.. ) बिस्किट्स घेतली. तीन बिस्किट्स खाल्ल्यावर थोडी भूक तर भागली. मग जीभ मात्र म्हणाली थोडा और.. पण बिस्किट खायचा मूड नव्हता.. ऑब्वियसली मग बिस्किट ओपन करून फक्त क्रीम खाल्लं. फारच कमी क्रीम होतं. लहानपणी एका बिस्किटच्या क्रीमचा मस्त चिमुकला चेंडू व्हायचा. पण हे क्रीम फारच कमी होतं.
बरं एक बिस्किट ओपन करून क्रीम चट्टामट्टा केल्यावर दुसरं बिस्किट पण म्हणालं काइंडली रिपीट द सेम प्रोसेस.. ;p
मी लग्गेच तसं केलं..
शेवटचं बिस्किट पण तेच म्हणणार होतं. तेवढ्यात समोरच्या सीटवर एक चिमणी बसली होती. ती तिच्यासोबतच्या आजींना म्हणाली.. देखो वो मेरे जैसे खाती है..
ऊप्स...
आजूबाजूला कोणी असतं याचं भान का बरं बाळगावं लागतं.. मी तिच्याकडे पाहिलं, ती हसली..
वो इनोसंट स्माइल.. हाय मेरा तिसरा क्रीम का बिस्किट जानेवाला है..
तिसरं बिस्किट काढलं.. त्याचं क्रीम वेगळं केलं.. तिच्यासमोर धरलं.. म्हटलं.. खाओगी..? मेरे जैसा?
ती नको म्हणाली.. मग त्या क्रीमचा लहानसा चेंडू केला. तिला म्हटलं ऐसा खा के देख लो.. टेस्ट अलग होगी.. ट्राय तो करो..
तिने त्या बाईंकडे पाहिलं. त्या आजी क्रीमसारखंच गोडगोड हसल्या.
तिने पटकन् तो क्रीमचा चेंडू तोंडात टाकला. तिचे डोळे चमकले. किंवा मला तरी वाटले असे..
तिला म्हटलं.. अगली बार ऐसेही खाना. मैं छोटी थी तब ऐसेही खाती थी..
ती छान लाजत हो म्हणाली..
क्रीमचं बिस्किट असं अजून गोड झालं..

Comments

  1. इतका छान अनुभव वाचून आमचं तोंड, व दिवसही गोड झाला..
    अशाच छान छान लिहीत रहा....

    राजेंद्र मंत्री

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मृत्युपत्र

डोळ्यातला दुष्काळ